Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सुप नुकतेच वाजले. अनेक विषयावरुन अधिवेशनात चर्चा करण्यात आली. विरोधक-सत्ताधारी आमने-सामने येण्याच्या अनेक घटना अधिवेशनात घडल्या. शिंदे-फडणवीस सरकारमधील तीन मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप विरोधकांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी केलेल्या सभागृहात केलेल्या विधानावरुन राजकारण तापलं आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यांची मागणी भाजप नेते, हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी टि्वट करीत अजित पवारांना डिवचलं आहे. "धरणवीर”ना “धर्मवीर” कसे समजणार ..आता धर्म रक्षणासाठी ..तलवार नको “शाही पेन” ही चालेल..,"असे टि्वट करीत राणे यांनी नाव न घेता अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
"छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं. आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील," असं शंभूराज देसाई यांनी माध्यमांना सांगितले.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.