Sanjay Raut sarkarnama
मुंबई

संजय राऊतांचे मोठे विधान, ईडी मला अटक करणार आहे

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चौकशीसाठी कार्यालयात नेण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चौकशीसाठी कार्यालयात नेण्यात आले. ईडी (ED) कार्यालयाच्या बाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. ईडी मला अटक करणार आहे, मी अटक करवून घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

राऊत यांना त्यांच्या घरातून ईडी कार्यालयात नेत असताना शिवसैनिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राऊत म्हणाले, जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, मी घाबरत नाही. राजकीय सुडाने हे सगळे चालले आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचे बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पेढे वाटा, असा टोला त्यांनी लगावला. कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जात आहे. यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल. राजकीय सुडाच्या कारवाया भाजपच्या विरोधकांवर सुरु आहेत. आमच्यासारखी ही काही लोक आहेत. जी न झुकता कारवाईला सामोरे जातात. काहीजन शरणागती पत्करतात. संजय राऊत असा नाही, मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडली नाही. जे काय पत्राचाळ वगैरे आहे कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हे सुद्धा मला माहित नाही. शिवसेना मोडायची तोडायची, माझा आवाज बंद करायचा आणि उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचे, त्यासाठी ही कारवाई सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. अशाने शिवसेना, महाराष्ट्र कमजोर होणार नाही. माझ्यावरच्या कारवाईतून शिवसेना आणि राज्याला लढण्याचे बळ मिळेल, मी माझे बलिदान द्यायला तयार असल्याचेही राऊतांनी सांगितले.

ईडीचे अधिकारी, महाराष्ट्रातील देशातीलच आहेत. त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी खासदार आहे, आम्हीच कायदे बनवतो. मला कायद्याचे महत्त्व कळते, बदल्याच्या भावनेने शिवसेनेला संपवण्यासाठी व ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावरती कारवाई सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मी जवळचा सहकारी होतो. त्यामुळे बाळासाहेबांचे लढण्याचे सगळे गुण आमच्यामध्ये आलेले आहे. मी डरपोक नाही, कर नाही तर डर कशाला, असा एक प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला त्यांना सांगतो कर नाही आणि डरही, नाही शेवटपर्यंत पक्ष सोडणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

अनेकांना वेळ वाढवून दिला जातो सध्या अधिवेशन सुरू आहे. मात्र, मला कोणतीही नोटीस न देता पहाटे ईडीचे अधिकारी घरी आले. माझ्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेले गेले. मात्र, आम्ही लढा लढत आहोत. मी सहा महिन्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून माझ्यावर कसा दबाव आणला जातो, हे कळवले होते, असे राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT