Raut Defamation Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला. त्यावर आपल्यावरील आरोप निराधार आणि अवमानकारक असल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी राऊतांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. त्याची आज शिवडी न्यायायालयात सुनावणी होती. त्यावेळी राऊत आणि सोमय्या दोघेही एकमेकांसमोर आले. त्यावेळी राऊतांनी सोमय्या यांना नमस्कार करून त्यांची विचारपूस केली.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी १२ एप्रिल २०२२ रोजी सामना वर्तमान पत्रात लेखात लिहिले की, मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील १५४ पैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतले. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी ३ कोटी ९० लाखांचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला आहे.
त्यात म्हटले की, "या लेखामुळे माझ्यावर खूप मानसिक तणाव निर्माण झाला होता. लेखानंतर माझे सर्व नातेवाईक आणि मित्र माझ्याकडे संशयाने पाहू लागलेत. तसेच ते माझी चौकशी करू लागलेत. समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. माझी प्रतिमा डागाळली. या लेखानंतर मला लोकांसमोर जायला लाज वाटत आहे."
या प्रकरणी सध्या मेधा सोमय्या (Medha Somaiyya) यांची उलटतपासणी सुरू आहे. त्यासाठी सोमय्या आणि खासदार राऊत न्यायालयात उपस्थित झाले होते. त्यावेळी राऊत यांनी सोमय्यांना नमस्कार केला. तसेच त्यांची विचारपूस कली. त्यानंतर संजय राऊत यांचे वकील मनोज पिंगळे यांनी कोर्टाला लेखी उत्तर सादर केले. तर मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी सामना वर्तमानपत्राची प्रत न्यायालयासमोर सादर केली.
दरम्यान, या प्रकरणी झाल्या सुनावणीला संजय राऊत वारंवार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने राऊतांना २९ मार्च रोजी एक हजारांचा दंड ठोठावला होता.
काय आहे प्रकरण ?
मीरा-भाईंदर परिसरात १५४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातील १६ शौचालयाचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. त्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिकेची फसवणूक केली. तसेच शौचालयाचा एकूण १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याचे आरोप खासदार राऊत यांनी केले आहेत. त्यावर सोमय्या यांनी राऊतांवर १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.