Ambadas Danve On Shinde: मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात ठाण्यातील कुख्यात गुंड? अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : काय हा 'फडतूस'पणा? अगोदर गुजरातला...
Ambadas Danve On Shinde
Ambadas Danve On ShindeSarkarnama

Mumbai News : राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपले मंत्री, आमदार आणि खासदारांसह दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर गेले. या दौऱ्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली. तसेच या दौऱ्यावरुन महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे. याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्यात ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे असल्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. टि्वटद्वारे दानवे यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

दानवे म्हणाले, काय हा 'फडतूस'पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे याला तेथे धुवायला नेलेलं वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हांला चालते का असा सवालही दानवे यांनी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. दानवे यांनी ही टीका करताना शुभम जटाल या टि्वटवर अकाऊंटचा संदर्भ दिला आहे.

Ambadas Danve On Shinde
Thackeray-Shinde Politics: मुख्यमंत्री अयोध्येला नेलेल्या गुंडांना शरयु तिरावर शुद्ध करायला घेऊन गेले होते का? राऊतांनी डिवचलं

शुभम जटाल यांचं टि्वट काय ?

शुभम जटाल यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील नेतेमंडळींच्या विमानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या लोकांसोबत काय करत आहे असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत अयोध्यावारीला गेला काय..?? खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे असं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Ambadas Danve On Shinde
MP Dhanorkar News : धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दंगली घडविण्याचे षडयंत्र !

गुंडांना शरयु तीरावर शुद्ध करायला घेऊन गेले होते का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाने जे गुंड नेले होते त्यांना शरयू तीरावर पवित्र करण्यासाठी घेऊन गेले होते का?,असा प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. शक्तीप्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे. ठाण्याचा नाकाही आहे ना, तिथे करा शक्तीप्रदर्शन. तुमच्या विमान जे गुंड, मवाली, खंडणीखोर बसले होते. विमानात तुमच्या शेजारी जे बसले होते. शरयु नदीत त्यांना शुद्ध करायला घेऊन गेले होता का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com