Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

सोमय्यांना भ्रष्टाचाराची कागदपत्रे खुद्द संजय राऊतांनीच दिली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपचे (bjp) माजी खासदार किरीट सोमय्या ( kirit somaiya) सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवतात. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सोमय्या यांनाच पत्र लिहिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Rauts letter to BJP leader Kirit Somaiya)

या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. या प्रकरणी ईडी किंवा सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी राऊतांनी किरीट सोमय्या यांच्याकडे केली आहे. राऊत म्हणाले, तुम्ही दररोज वेगवेगळ्या वेगवेगळे आरोप करत असतात. त्यामुळेच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. माझ्या पिंपरी-चिंचवडमधील दौर्यात काही नेत्यांनी मला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली. त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार, 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, टेंडर आणि यातील कंडिशन क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला.

'या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा जास्त फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीची मागणी करा. भष्टाचार म्हटले की लोकांना तुम्हीच आठवता. ही फाईल मी ईडीला देण्याएवजी तुम्हाला देत आहे. कारण तुम्ही दिलेल्या तक्रारीवर एजेंसी काम करतात. तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्यामुळे अनेक अधिकारी आणि नेते जेलमध्ये केले आहेत. तुम्ही त्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला. या प्रकरणी तुम्ही ईडीकडे चौकशीची मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT