मुंबई : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. यानंतर राऊत यांच्या आईंना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले आहे.
आज (ता.३१ जुलै) सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Sanjay Raut latest news)
राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी आपल्या गळ्यातील भगवं उपरणं फडकवत मी लढतच राहणार, असा इशारा दिला. त्यावेळी त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आज सकाळीच ईडीच्या पथकाने राऊतांच्या घरी छापेमारी केली होती. तब्बल सडेनऊ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा राऊत यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या आईसह घरातील इतर सदस्यही भावूक झाले होते. याआधी राऊत यांची दादर येथील सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आली होती. आज राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रूपये देखील जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या कारवाईच्या वेळी राऊतांच्या समर्थनार्थ त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी केली होती आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तेव्हा राऊत यांच्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी गॅलरीमधून हात दाखवत शिनसैनिकांना अभिवादन करतांना दिसत होते. दरम्यान राऊत यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. राऊत यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले.
दरम्यान या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच त्यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.