‘ईडी’च्या कारवाईत तोंडी नव्हे, तर कागदावरील पुरावेच महत्वाचे ठरतात

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
Ujwal Nikam at Nagpur.
Ujwal Nikam at Nagpur.Sarkarnama

पुणे : सक्त वसुली संचलनालयाच्यावतीने (ED) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना केलेली कारवाई कागदोपत्री पुराव्याच्या आधारे केलेली असावी. कारण ‘ईडी’च्यावतीने करण्यात येणारी कोणतीही कारवाई तोंडी नव्हे तर कागदावर पुरावे काय आहेत यावर अवलंबून असते. कायद्यात कागदाला महत्व आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी आज व्यक्त केले.

Ujwal Nikam at Nagpur.
ईडी मला अटक करणार आहे आणि त्यासाठी मी स्वखुशीने जात आहे... : संजय राऊत यांचे वक्तव्य

खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. राऊत हे चौकशीला सहकार्य करीत नसल्याचे कारण अटक करण्यासाठी देण्यात आले आहे. याआधी राऊत यांना ‘ईडी’कडून तीन समन्स बजावण्यात आली. मात्र. त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती. संसद अधिवेशनानंतर आपण चौकशीला हजर राहू, असे सांगितले होते. मात्र, याआधीही समन्स बजावल्यानंतर खासदार राऊत चौकशीला हजर न राहिल्याने ‘ईडी’ने त्यांना आणखी वेळ दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Ujwal Nikam at Nagpur.
राऊतांवरील कारवाई अन् मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा; केसरकरांनी स्पष्टच सांगितले

आज सकाळी ‘ईडी’च्या आधिकाऱ्यांचे पथक खासदार राऊत यांच्या मुंबईतील घरी पोचले. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेऊन साडेपाच-सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना ‘ईडी’ कार्यालयात आणण्यात आले. या संदर्भात वृत्त वाहिनीशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले, ‘‘ ईडीच्या पथकाने खासदार राऊत यांच्या घरी सुमारे नऊ तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्याचे दिसत आहे. कोणत्याही प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून चौकशीअंती योग्य माहिती मिळत नाही किंवा चौकशीला सहकार्य होत नसेल तर आधिकारी ताब्यात घेण्याची कारवाई करतात.’’

दरम्यान, खासदार राऊत यांच्यावरील कारवाईला मुंबईसह पुण्यातही विरोध करण्यात आला. मुंबईत खासदार राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांना अटक करायची असेल तर त्याआधी आम्हालाही अटक करा, अशी मागणी शित्तसैनिकांकडून करण्यात येत होती. पुण्यातदेखील सारसबागेजवळ शहर शिवसेनेच्यावीतने आंदोलन करून रस्ता अडविण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com