Bharat Gogawale Sarkarnama
मुंबई

Bharat Gogawale : "मला मंत्रिपद मिळत असताना एकानं राजीनाम्याची धमकी दिली होती," भरतशेठ गोगावलेंचा रोख कुणाकडे?

Akshay Sabale

Maharashtra Political News: 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी करत अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपच्या महायुतीचं सरकार स्थापन झालं. शिंदे गटातील अनेकांना मंत्रीपद मिळालं, तर बाकींना आश्वासनं देण्यात आली.

मात्र, 2023 मध्ये अजितदादा पवार काही आमदारांसह महायुतीत सामील झाले आणि शिंदे गटातील अनेकांचं मंत्रिपदाचं स्वप्न भंगलं. त्या शिंदे गटातील आमदारांची महामंडळावर बोळवण करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

मला मंत्रिपद मिळत असताना एका आमदारानं राजीनामा देण्याची धमकी दिली होती, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केला आहे. आमदार संजय शिरसाट यांच्याकडे आमदार गोगावले यांचा अप्रत्यक्षपणे रोख होता.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर, भरत गोगावले यांची 'एसटी' महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, भरत गोगावले यांनी अद्यापही 'एसटी'चा कार्यभार स्वीकारला आहे.

'एसटी'चा अध्यक्ष केल्यानं गोगावले नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच गोगावले यांनी शिरसाट यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं शिंदे गटात 'सार काही अलबेल' नसल्याचं समोर आलं आहे.

गोगावले काय बोलले?

अंबरनाथ येथे आमदार बालाजी किणीकर यांनी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना भरत गोगावले म्हणाले, "मला मंत्रीपद देण्याची वेळ आली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विचारलं शेठ काय करायचं? तेव्हा एकजण म्हणाला, तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली की मी 12 वाजता राजीनामा देतो. म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आता सिडकोचे अध्यक्ष केलं."

"त्यानंतर एकजण म्हणाला मला मंत्रिपद नाही भेटलं, तर माझी बायको आत्महत्या करेल. त्याला बोललो, आमच्यासरख्यांनी काय करायचं?" असा किस्सा गोगावले यांनी सांगितला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT