Eknath Shinde-Sanjeev Bhor Patil
Eknath Shinde-Sanjeev Bhor Patil Sarkarnama
मुंबई

मराठा क्रांती मोर्चाचा महत्वाचा चेहरा शिंदे गटात सामील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठा क्रांती मोर्चातील ( Maratha Kranti Morcha) अग्रणी चेहरा आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील (Sanjeev Bhor Patil) यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रत्यक्षात निवडणुकीला अजून अवधी असला तरी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून आपापले गट मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Sanjeev Bhor Patil founder president of Shiv Prahar organization joined Eknath Shinde group)

संजीव भोर हे त्यांच्या अभ्यासू व आक्रमक भाषण शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. मागील वीस वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत सातत्याने सक्रिय राहिलेले आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसह पाणी प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, शेतजमीन कुळांचे प्रश्न अशा समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी संजीव भोर पाटील यांनी आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अमानुष कृत्य जगासमोर आणण्यासाठी पहिले प्रभावी आंदोलन भोर यांनी केले होते.

शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून बाळासाहेबांची शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. भोर यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात स्वागत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी खासदार भावना गवळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, शिवप्रहार संघटनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून दोन्ही गटांकडून पक्षबांधणीवर लक्ष देण्यात येत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबरोबरच ते राज्याचा दौराही करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT