Mumbai News, 12 Nov : 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या सूत्रानुसार सध्या राज्यातील राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीतील फूटीपासून याच समिकरणाचा वापर दोन्ही बाजूने केला जात आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजांना शिंदे आपल्या पक्षात घेत आहेत. अशातच आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर केला आहे.
मुंबईतील साकीनाका येथील सभा संपवून 90 फूट रस्त्यावरून जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. हा ताफा संतोष कटके नावाच्या व्यक्तीने हातात काळा झेंडा घेऊन हा ताफा अडवण्यचा प्रयत्न केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे स्वत: रस्त्यावर उतरले होते. या घटनेमुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतली आहे. ठाकरेंनी या संतोष कटके आणि त्याचे वडील साधू कटके यांना मातोश्रीवर बोलवून त्यांना शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून उद्धव ठाकरेंनी संतोष कटकेचं कौतुक केल्यामुळे शिंदेंचा विरोधक तो आपला मित्र हे सूत्र ठाकरेंनी अवलंबल असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.