Rahul Gandhi VIDEO: चिखलीतील सभा रद्द होऊनही राहुल गांधींनी मुद्द्यालाच हात घातला! म्हणाले...

Rahul Gandhi Chikhli Rally Canceled Due to Technical Glitch in Aircraft: राहुल गांधी यांची आज चिखली येथे होणारी सभा रद्द करावी लागली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना सभास्थळी पोहचता आले नाही.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंगळवारी विमानातील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे होणाऱ्या सभेच्या ठिकाणी त्यांना पोहचता आले नाही. त्यामुळे ही सभा रद्द करावी लागली.

सभा रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बुलढाण्यातील चर्चेत असलेल्या मुद्दयाला हात घातला. कापूस व सोयीबीन उत्पादक शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी एक संदेश दिला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन राहुल यांनी दिली आहे.

Rahul Gandhi
Nawab Mailk : नवाब मलिकांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार? ED ने उचललं मोठं पाऊल...

काय म्हणतात राहुल गांधी?

राहुल यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, माझी चिखली येथे सभा होणार होती. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी मी तिथे पोहचू शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाध साधणार होतो. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मला माहिती आहे, भाजप या शेतकऱ्यांना मालाला उच्च भाव देत नाही. सत्तेमध्ये इंडिया आघाडीची सत्ता येताच आम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू, असे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राहुल यांची चिखली येथील सभा रद्द झाली असली तरी गोंदियामध्ये त्यांची दुसरी सभा नियोजित वेळेनुसार होणार आहे.

Rahul Gandhi
Chirag Paswan : राजकीय फेरा, चिराग पासवान यांच्या काकांना 40 वर्षे जुनं घर कराव लागलं खाली

महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेनंतर मंगळवारी राहुल गांधींची पहिली सभा चिखली येथे होणार होती. पण पहिलीच सभा रद्द करावी लागली. गोंदियानंतर 17 तारखेपर्यंत त्यांच्या ठिकठिकाणी सभा व रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याही प्रचारसभांचे महाराष्ट्रात नियोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com