Beed, 27, March 2025: संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येचे धागेदोरे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यापर्यंत जात असताना सुदर्शन घुले या टोळाचा म्होरक्या असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातून वाल्मिक कराड याचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव वगळण्यात आले का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देशमुख यांच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आल्यानंतर घुले हाच या हत्येमागील सुत्रधार असल्याचे चित्र आहे, पण वाल्मिक कराड हा सुत्रधार नसल्याचे काहीसे स्पष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे का, अशी शंका घेण्यात येत आहे. हत्येचा गुन्हा, आणि खंडणीचा गुन्हा वेगळा करण्यात आला. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणार आरोपी म्हणून सुदर्शन घुले यांचे नाव पहिल्या क्रमाकावर आहे.
वाल्मिक कराड याला वाचविण्यासाठी असे करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. आता दोषारोप पत्रात टोळी प्रमुख म्हणून सुदर्शन घुले याचे नाव आहे, त्यामुळे ही पळवाट तर नाही ना, अशी शंका दमानिया यांना आहे. पण या हत्येचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे, असे ठामपणे दमानिया यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी करा, असे मी धनंजय देशमुख यांना सांगितले असे दमानिया यांनी सांगितले. वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याने त्याचे नाव हे पहिलं आले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
आज आरोपींनी देशमुख यांच्या हत्येतील कबुली पोलिसांसमोर दिली आहे, पण ही कायद्यानुसार आरोपींनी ही कबुली न्यायाधीशांसमोर देणे गरजेचे असते, तसे झाले या खटल्याचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली. आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर या खटल्याच्या सुनावणीला गती मिळेल, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"संतोष देशमुख याने आम्हाला आवादा कंपनीच्या आवारात मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. त्या मारहाणीचे व्हिडीओ देशमुख याने सोशल मीडियावर व्हायरल करुन आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता. आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात तो अडथळा येत होता, म्हणून आम्ही त्याची हत्या केली, असे घुले याने पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.