Maharashtra Assembly Session Sarkarnama
मुंबई

Satara ZP Election row : लागलंय, मला मारलंय! विधानसभेत देसाई संतापले, शिंदेंनीही घाव घातला; त्याचवेळी फडणवीस आले अन्...

Shambhuraj Desai anger assembly : मी चार दिवसांपासून गोळ्या खातोय. मुका मार प्रचंड लागलाय. मी ४० वर्षे राजकारणात होतो. माझे आजोबा मंत्री होते. लोकशाहीचे रक्षण करणे ही माझी चूक होती का, असा सवाल शंभूराज देसाईंनी केला.

Rajanand More

Maharashtra assembly controversy : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधिक्षक तुषार दोशींसह १०० पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विधानसभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर भाष्य केले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच मंत्री शंभूराज देसाईंसह शिवसेनेच्या इतर सदस्यांनी हा मुद्दा ऐकून घेण्याची विनंती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. पण त्यांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर संधी देतो असे अध्यक्ष म्हणताच देसाईंनी लागलंय, मला मारलंय, असे म्हणत या घटनेचे गांभीर्य दाखवून दिले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. खोतकर यांच्यानंतर देसाईंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

देसाईंनंतर एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. या घटनेचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत ते म्हणाले, या निवडणुकीची तारीख जाहीर झाली तेव्हा देसाईंनी मला फोन केला होता. दोन मतदारांवर कधी काळातील कुठला गुन्हा एक दिवस आधी दाखल केला आहे. त्यांना अटक होणार आहे. त्यावर मी दोशींना फोन करत विचारणा केली. उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही, असे त्यांना सांगितले. एसपींनी मला त्यांना वंचित ठेवणार नाही, असे सांगितले.

पोलीस महासंचालक दातेंनाही मी फोन केला. मतदान कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक दोन मतदारांना अटक करू शकतात. त्यावर दातेंनी दोशींना फोन केला. त्यानंतर दोशींनीही ते मान्य केले. जिल्हा परिषदेच्या गेटवर थांबलेल्या लोकांना तुम्ही सांगा, असेही मी त्यांना सांगितले. पण तिथे मंत्री, पदाधिकारी कोणी बघितले नाही. आरोपीला जसे पकडतात तसे पकडून घेऊन गेले. ते दोनच मतदार त्यांनी कसे पकडले. मी डीजींना पुन्हा फोन केला. ते म्हणाले, असे होणार नाही. मी म्हणालो, निवडणूक पार पडतेय. त्यानंतर निवडणूक संपली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी परिस्थिती आपण पहिल्यांदाच पाहिली, अशी तीव्र नाराजी शिंदेंनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे बोलत असतानाच मुख्यमंत्री फडणवीसही सभागृहात आले. शिंदे यांचे बोलणे संपल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याआधारे योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.  

काय म्हणाले शंभूराज देसाई?

व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाने मला दिला आहे. दोन सदस्य माझ्यासह मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आमच्यासोबत चालले होते. लिफ्ट मधून आम्ही बाहेर आलो की शंभर पोलिसांनी आम्हाला अडविले. सदस्य म्हणत होते आम्हाला मतदानाला जायचे आहे. आरोपी फरफटत नेतात तसे मला आणि त्या सदस्याला नेले. मी चार दिवसांपासून गोळ्या खातोय. मुका मार प्रचंड लागलाय. मी ४० वर्षे राजकारणात होतो. माझे आजोबा मंत्री होते. लोकशाहीचे रक्षण करणे ही माझी चूक होती का, असा सवाल देसाईंनी केला.

समोरच्या बाजूचे लोकं पलीकडच्या बाजूला होता. त्यांचा काही संबंध नसताना ते तिथे होते. दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपीसारखे पळवत नेले. आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यानंतरही त्यांना पकडता आले असते. यामागे जिल्हा परिषद तुषार दोषी, पोलीस निरीक्षक देवकर आणि सहायक निरीक्षक गर्जे यांना तिघांना मी ओळखले असून या तिघांसह त्यांच्यासोबत असलेले १०० पोलिसांना बडतर्फ करावे, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT