Rahul Gandhi, Amit Shah
Rahul Gandhi, Amit Shah sarkarnama
मुंबई

Amit Shah : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली घेत नाही ; अमित शहांचा टोला

सरकारनामा ब्युरो

Amit Shah : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलेच फटकारले आहे.शहा एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती बोलत होते. मुलाखतीत अमित शाह यांना सावरकरांच्या बदनामी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. (Amit Shah latest news)

अमित शहा म्हणाले, "राहुल गांधी यांचे इतिहासाचे ज्ञान अल्प आहे. त्यांनी वारंवार सावरकरांविषयी गैरउद्गार काढले आहेत. पण देशात त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. जे सावरकरांवर टीका करतात त्यांनी सावरकर ज्या अंदमानच्या काल कोठडीत राहिले, तेथे 10 तास राहून दाखवावे आणि मग बोलावे,"

सावरकर हे एकमेव स्वातंत्र्ययोद्धे आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी दोन हा जन्म काळेपणाच्या कारावासाची शिक्षा दिली होती पण त्यांना कोणत्याही सरकारने वीर हा किताब दिला नाही, तर संपूर्ण देशवासीयांनी वीर हा किताब दिला आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले.

"काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यापूर्वी वीर सावरकरांनी युरोपमध्ये जाऊन भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ उभारली होती. ते पहिले क्रांतिकारक नेते होते, ज्यांनी 1857 च्या विद्रोहाला स्वातंत्र्यसमर असे नामाभिधान दिले. त्यावर ग्रंथ लिहिला. परंतु, ब्रिटिशांनी तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यावर बंदी आणली. ही जगाच्या इतिहासातली एकमेव घटना आहे," असे शहा म्हणाले.

७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या देगलूर तालुक्यातून प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेचा काल (रविवारी) राज्यात शेवटचा दिवस होता. १४ दिवसांच्या सलग प्रवासानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल महाराष्ट्राचा निरोप घेतला. त्यानंतर ते थेट मध्य प्रदेशाच्या दिशेने मार्गस्थ झाले. राहुल गांधीच्या या यात्रेत काल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT