शर्मिला वाळुंज
Raju Patil : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेने राज्यपालांचा या विधानाचा निषेध केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरातून टिका होत आहे. शिवप्रेमी जनता, संघटनांनी राज्यापालांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचा मनसे आमदार राजू पाटील यांनीही समाचार घेतला आहे. "कोश्यारी महाराष्ट्रात आले पण हुशारी तिकडेच ठेवून आलेत. त्यांची आणि हुशारीची गळाभेट करायला त्यांना परत त्यांच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे," अशा शब्दांत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी कोश्याची यांच्यावर टिका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कोश्यारी यांच्या होशियारीवर बोलत कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे. त्यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील कोश्यारींचा खरपूस समाचार घेतला आहे. दिवा येथील आयोजित एका कार्यक्रमास मनसे आमदार पाटील उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता कोश्यारी यांच्या विधानाविषयी त्यांनी आपले मत व्यक्त करीत टिका केली.
कोश्यारी यांच्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलले पाहीजे असे म्हणत आमदार पाटील यांनी भाजपाची देखील कानउघडणी केली आहे. "कोश्यारी इथे आले पण हुशारी तिकडेच ठेवून आले आहेत. त्यांची आणि हुशारीची गळाभेट करुन द्यायला त्यांना त्यांच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे," असे पाटील म्हणाले.
अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ही. एक तर आपण काय इतिहास बदलू शकत नाही. त्याचा उहापोह होणे गरजेचे आहे. काही गोष्टी माहित नसताना त्याच्यावर जी उत्तर दिली जातात. त्या वेळची परिस्थिती काय होती, त्यावेळी लिहिलेले जे पत्र आहे, त्याचे संदर्भ काय आहेत अशा गोष्टींचा विचार न करता, सरसकट जी मतं व्यक्त केली जातात ती चुकीची आहेत. तुम्ही पहात असाल तर, या अशा ज्या घटना आहेत त्या निवडणुका जवळ आल्यावर होतात. या त्या अनुषंगाने चाललेल्या आहेत. अन्यथा या अशा चालणाऱ्या गोष्टी नाहीत याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.