Harshavardhan Jadhav News : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसल्याने त्यांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशातच उपचारासाठी त्यांना रूग्णालयात नेतानाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
देशाची काळजी घ्या, चांगलं वागा,वाचलो तर भेटू, असा संदेश त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. तसेच, मला बहुतेक अटॅक आला आहे. माझी एन्जिओ प्लास्टी झाली आहे. माझं डोकं दुखतंय, छातीत कळ येतेय, खूप घाम येतोय. मला सरकारच्या गाडीने घेऊन चालले आहेत. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या, कन्नड विधानसभा मतदारसंघाची काळजी घ्या, चांगलं वागा, चांगल्या लोकांशी बोला, परोपकारी भावनेने जगा. वाचलो तर पुन्हा भेटू, असं त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन जाधव दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होते. गडकरी यांच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी नुकताच भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात प्रवेश केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.