Devendra Fadanvis News: काहींना कमी जास्त पण काँग्रेसच्याही आमदारांना निधी दिला : फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Maharashtra Politics : अडीच वर्षात एक फुटकी कौडी विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली गेली नाही.
Devendra Fadanvis News:
Devendra Fadanvis News:Sakarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis on funds Allocation : राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना निधीच मिळाला नसल्याचा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे. दुसरीकडे, आपल्यासोबत आलेल्या आमदारांना जास्त आणि इतर आमदारांना कमी निधी दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला.

राऊतांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उत्तर दिले."उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक नवा पैसा विरोधी पक्षनेत्यांना दिला गेला नाही. अडीच वर्षात एक फुटकी कौडी विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली गेली नाही. कोविड फक्त विरोधकांसाठी होता. एक नवा पायंडा सुरू झाला. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं नाही. विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं, ते तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर आज अशा प्रकारची परिस्थिती आली नसती, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

Devendra Fadanvis News:
Maharashtra Politics: शंभूराज देसाईंच्या बैठकीकडे मंत्री चव्हाण, गायकवाड, भोईरांची दांडी

आम्ही मेरिटपरत्वे निधीवाटपावरील स्थगिती उचलली आहे. त्यात काँग्रेसच्या १५ आमदारांची लिस्ट देतो, ज्यांची स्थगिती उचलली यात काही माजी मुख्यमंत्र्याचाही समावेश आहे.त्यांची १५०-१५० कोटींची स्थगिती उचलली असल्याचही फडणवीसांनी नमुद केलं.

नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली. स्थगिती दिल्यानंतर प्रश्न होता की, एकीकडे विरोधी पक्षांच्या आमदारांना काहीच मिळालं नाही आणि दुसरीकडे सत्तारुढ पक्षाच्या आमदारांना एवढा निधी दिला होता. हा आक्रोश होता. म्हणून ही स्थगिती देण्यात आली होती. नंतर मेरीटच्या आधारावर ती स्थगिती उचलण्यात आली. राष्ट्रवादीचे जे आमदार आमच्यासोबत आले, त्यांनाच नाही तर जे आमदार नाही आले त्यांच्यासाठीही पैसे दिल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadanvis News:
Jayant Patil Meets Sunil Tatkare : जयंत पाटील, सुनील तटकरेंची मैत्री पुन्हा फुलली !

काँग्रेसच्या आमदारांनही कुठल्या ना कुठल्या हेडमध्ये त्यांना पैसा मिळाला आहे. पण सरसकट सगळ्यानांच मिळालेला नाही असं सांगत काही ठिकाणी आम्हाला २५ कोटी निधी मिळाला असेल तर त्यांना पाच कोटीच मिळाला असेल, हे मी हे मंजूर करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com