MNS MLA Raju Patil Latest News
MNS MLA Raju Patil Latest News sarkarnama
मुंबई

सध्याचे राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये; मनसे आमदार असे का म्हणाले? कारण...

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : देशातील विविध राजकीय पक्षांकडून भारतीय चलनी नोटांवर कोणाचे फोटो असावे या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण रंगले असताना मनसेचे (MNS)आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सर्वच पक्षांना फटकारले आहे. फालतू राजकारण, असे ट्विट करत आमदार पाटीलांनी 'सामान्यांना याचा काय फायदा? उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय? असे लिहीत सामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडत त्याकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. (MNS MLA Raju Patil Latest News)

निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज लावणं कठीण आहे. गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा, अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत,असे संजय निरुपम यांनी म्हटलयं तर दुसरीकडे भाजपचे राम कदम यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा, अशी मागणी ट्विट करून केली आहे.

भारतीय चलनी नोटांवरील फोटोंवरून होणारे हे राजकारण पाहता कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार पाटील यांनी केलेले ट्विट आता चर्चेत आले आहे. त्यांनी कोणत्या नेत्याच्या फोटोची मागणी केली असे वाटत असताना पाटलांनी मात्र या सुरू असलेल्या राजकारणावरून फालतू राजकारण, असे म्हणत सर्वच पक्षांना फटकारले आहे.

पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, सध्याचे राजकारण पाहून जनता #NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे. त्यामुळे महागाई कमी करा, शेतकरी बांधवांना दिलासा द्या, रस्ते चांगले करा,चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा,रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? #फालतू_राजकारण, अशा शब्दात त्यांनी सर्वच पक्षांना फटकारले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT