Mumbai, 24 January : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय डावपेचांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये परत येतील, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी अजितदादांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने केलेला त्याचा अपमान पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही’, अशी गुगली टाकली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात दोन्ही बाजूंकडून टोकाची टीका झाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये तर आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचा (Ajit Pawar) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती.
राज्याचे प्रमुख आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक विधान करत अजितदादांचे नाव न घेता सुनावले होते. तसेच, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे अजितदादा दुखावल्याचे सांगितले जात आहे. त्यातूनच या घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊतांच्या विधानावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, महायुती सरकारमध्ये अजितदादांकडे अर्थखातं आहे, त्यामुळे सत्तेचा खरा ‘अर्थ’ त्यांनाच कळालेला आहे, त्यामुळे अजितदादा सत्तेपासून बाजूला येतील , असे मला अजिबात वाटत नाही. पण अजित पवार हे महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्या येण्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल.
राज्यातील चार वर्षांची सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता अजितदादांची आहे, असं मला अजिबात वाटत नाही. पण, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने केलेला त्यांचा अपमान पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही, अशी गुगली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टाकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.