Share market  Sarkarnama
मुंबई

युद्ध रशिया-युक्रेनचे अन् फटका भारताला; गुंतवणूकदारांचे साडेतीन लाख कोटी पाण्यात

रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia-Ukrain War) गंभीर परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर (Share Market) होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia-Ukrain War) गंभीर परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर (Share Market) होत आहेत. भारतीय शेअर बाजारालाही याचा मोठा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज सकाळी 870 अंशांनी कोसळून 55 हजार अंशांच्या पातळीखाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल साडेतील लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

रशियाने (Russia) युक्रेनविरूद्ध (Ukraine) पुकारलेले युद्ध आणि जागतिक पातळीवरील घसरण याचा फटका आज भारतीय शेअर बाजारांना बसला. सेन्सेक्स 869 अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 233 अंशांनी कोसळला. सेन्सेक्समधील पॉवरग्रीड, टाटा स्टील आणि सन फार्मा हे शेअर वगळता इतर सर्व शेअर घसरले. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आणि त्यांचे तब्बल साडेतीन लाख कोटी रुपये पाण्यात गेले. सेन्सेक्समध्ये सलग सात दिवस घसरण झाल्यानंतर अखेर 25 फेब्रुवारीला तो वधारला होता. त्यात 1 हजार 328 अंशांची वाढ झाली होती. त्यावेळी निफ्टीमध्येही 410 अंशांची वाढ झाली होती. मागील आठवड्यात सेन्सेक्समध्ये 1 हजार 974 अंश आणि निफ्टीत 618 अंशांची घसरण झाली होती.

युरोपमधील तणावाचे वातावरण आणि युद्धामुळे आशियातील बहुतांश शेअर बाजारांमध्ये आज घसरण नोंदवण्यात आली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ होत आहे. खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भावाचा भडका उडाला आहे. ब्रेंटचा भाव प्रतिबॅरल आज 5 टक्क्यांनी वाढून 99.61 डॉलरवर गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT