Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News : रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले, "महाराष्ट्रात सध्या कमिशनचा रेट..."

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar Attacks on State Government : गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने बंडखोर आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसह भाजपवर '५० खोके-एकदम ओक्के' अशी टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकार (State Government) विरोधकांची विधायक कामांत अडथळे आणत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. विधायक कामाच्या फाईल्स क्लिअर करण्यासाठी सत्ताधारी आमदार विरोध करतात. परिणामी जनतेचे नुकसान होत असल्याचा आरोपच पवार यांनी कोल्हापूर येथे शनिवारी (ता. २०) एका मंत्र्याचे नाव घेऊन केला होता. त्यानंतर रविवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यात टक्केवारीचा खेळ जोरात असल्याचा त्यांनी आरोप केला. ते म्हणाले," महाराष्ट्रात सध्या ५० टक्के कमिशनचा रेट चालू आहे. राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकले जात नाहीत. आता ते पैसे कुठून येतात, याचा अंदाज सामान्य लोकांना आला आहे."

महाविकास आघाडीत (MVA) कोणतेही मतभेद किंवा मनभेद नसल्याचा दावाही यावेळी रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले, भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन लढणार आहोत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद आणि मनभेद नाहीत. वज्रमूठ सभा जूनमध्ये होतील. आम्हाला उन्हातानात सभा करायची नाही. आम्ही जूनमध्ये काळजी घेऊन आणखी मोठ्या सभा आयोजित करणार आहोत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT