Kirit Somaiya and Neil Somaiya
Kirit Somaiya and Neil Somaiya  Sarkarnama
मुंबई

सोमय्या पिता-पुत्रांचा पाय खोलात! कधीही होऊ शकते अटक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने काल सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आज नील यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळला. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आज निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने नील यांचा जामीन अर्जही फेटाळून लावला आहे. यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना कधीही अटक होऊ शकते.

विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी संकलन अभियान राबवले होते. त्यामध्ये नागरिकांकडून निधी घेण्यात आला होता. त्यात जमा झालेली सुमारे 58 कोटींची रक्कम अद्याप सरकारकडे जमा केली गेली नाही, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा झालेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

नॉट रिचेबल असलेले सोमय्या अवतरले

नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज अवतरले. काल सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी प्रकरणाबाबत (INS Vikrant Scam) व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. उच्च न्यायालयात याबाबत संपूर्ण माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तसेच निधी संकलनाबाबत खुलासा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT