कोलकता : लोकसभा पोटनिवडणुकीच्या (Loksabha Election) मतदानामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकिटावर मैदानात उतरले आहेत. बंगालमधील असनसोल लोकसभा मतदारसंघात भाजपने (BJP) सिन्हांच्या विरोधात बॉलीवूडमधील हस्ती असलेल्या अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांना उतरवलं आहे. त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असून, हा हल्ला तृणमूल कार्यकर्त्यांनी केल्याचा गंभीर आरोप पॉल यांनी केला आहे.
असनसोलमध्ये मतदानावेळी हिंसाचार उसळला. काही जणांनी पॉल यांच्या ताफ्यावर हल्ला केला. तृणमूल कायर्त्यांनीच दगडफेक करीत काठ्यांनी हल्ला केल्याचा दावा पॉल यांनी केला आहे. यामुळे मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बोलताना पॉल म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. ममता बॅनर्जींनी कितीही प्रयत्न केले तरी भाजपचाच विजय होणार आहे.
अग्निमित्रा पॉल या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कलाकारांसाठी फॅशन डिझायनिंग केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये पक्षाने त्यांच्या भाजप महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षाची जबाबदारी टाकली. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना असनसोल दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा आता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना होत आहे.
बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी 16 एप्रिलला होणार आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे असनसोल मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलचे उमेदवार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.