Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Cabinet Meeting Decisions: 'लेक लाडकी' होणार लखपती; राज्य सरकारचे सात मोठे निर्णय कोणते ?

Ganesh Thombare

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या वेळी सात मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्याचादेखील निर्णय घेण्यात आला.

मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा अंतिम प्रस्ताव आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. या वेळी या योजनेला मंजुरी देण्यात आली. तसेच 'लेक लाडकी योजना' राज्यात आजपासून लागू होईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

याबरोबरच विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सात मोठे निर्णय कोणते ?

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.

    (महिला आणि बालविकास)

  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली.

    (उच्च व तंत्र शिक्षण)

  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.

    (जलसंपदा विभाग)

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    (परिवहन विभाग)

  • सांगली,अहमदनगर जिल्ह्यांत जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयांच्या निर्मितीचा निर्णय.

    (विधि व न्याय विभाग)

  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.

    (महसूल विभाग)

  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय.

    ( महसूल व वन विभाग)

    Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT