मुंबई : ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने (एनसीबी) आज एक दिवसाची कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आर्यन खान ह्याला आजची रात्र एनसीबीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. (ShahRukh Khan's son jailed by NCB in drug party case)
शाहरूख खानच्या मुलाच्या वतीने ज्येष्ठ वकिल सतीश माने शिंदे यांनी बाजू मांडली. पण, एनसीबीच्या कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आर्यन खान याला एक दिवसाच्या कोठडीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने शनिवारी रात्री एका लक्झरी क्रुझवर छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले होते. यात आर्यन खानचा समावेश होता. त्यावेळी त्याच्यासह इतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीअंती आज दुपारी एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन याला अटक केली होती. यात मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट आदींचा समावेश होता.
एनसीबीनेे या कारवाईत, 20 ग्रॅम कोकेन, 30 ग्रॅम चरस, 10 ग्रॅम एमडी, आणि 20 ग्रॅम टॅबलेट्स जप्त करण्यात आलं आहे. या आठ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, मला या पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होत. आपल्याकडून क्रुझरवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं स्पष्टीकरण आर्यन खानने दिलं होतं.
एनसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पुन्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि एका मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.