Uddhav Thackeray-Shambhuraj Desai Sarkarnama
मुंबई

Shambhuraj Desai News: तर जीभ हासडून टाकू...; कोकणातील सभेनंतर शंभूराज देसाईंचा ठाकरेंना थेट इशारा!

कोकणात ठाकरे गटाची सभा झाली. त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणातील सर्वात दर्जा घसरलेले भाषण हे कालचे भाषण होते.

सरकारनामा ब्युरो

Konkan News : कोकणात ठाकरे गटाची सभा झाली. त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणातील सर्वात दर्जा घसरलेले भाषण हे कालचे भाषण होते. उद्धवजींकडून इतक्या खालच्या थराची भाषा महाराष्ट्राला अपेक्षित नव्हती. आमच्या सारख्या लोकांनी त्यांच्यासोबत गेल्यावर्षीपर्यंत काम केलं. त्यांची वक्तव्ये सामान्य शिवसैनिकांची, जनतेची निराशा करणारे आहे.विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या पातळीला जाऊन उद्धवजींनी जी वक्तव्ये केली, त्याचा मी जाहीर निषेध करतो. (Shambhuraj Desai direct warning to Thackeray after meeting in Konkan)

कोकणात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर शिंदे गटाचे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या या भाषणाला शंभूराज देसाई यांनी थेट इशारा दिला आहे. आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडू, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

उद्धवजींना मी नम्रपणे सांगतो, त्यांच्यापेक्षा पुढच्या भाषेत आम्हालाही उत्तर द्यायला येतं. त्यांनाच बोलता येतं असं नाही आम्हालाही बोलता येतं. ते जसं जीभ हासडण्याची भाषा करतात, त्याच्या पुढच्या गोष्टी हासडण्याची आमच्यात ताकद आहे. पण एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे की आपण संयम सोडायचा नाही. पण आता आमच्या संयमाचा अंत झालाय.

आतापर्यंत खालच्या गटातील लोक बोलत होते, तोपर्यंत आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आता जर कोणी वरिष्ठ नेता बोलत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. पण ज्यांना दिवंगत बाळासाहेबांचा कौटुंबिक वारसा आहे, अशा लोकांनी, त्यांच्या मुलानेच अशी जीभ हासडण्याची भाषा करणं, याला आमचे नेते रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT