BJP News: आमदार दिलीप बोरसे यांनी रस्त्यांसाठी आणले १५ कोटी

Dilip Borse: सटाणा शहरातील रस्ते व सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी मंजूर
Dilip Borse
Dilip BorseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: पालिकेच्या शहरांतर्गत रस्ते विकास (Roads) आणि सुशोभीकरणासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून (Local Fund) १५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने (Maharashtra Government) मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरवात होईल अशी माहिती (BJP) आमदार दिलीप बोरसे (Deelip Borse) यांनी दिली. (BJP MLA Dilip Borse's efforts success for special fund)

Dilip Borse
Nashik Politics: गिरीश महाजन यांची काँग्रेस-भाजप सलोखा एक्सप्रेस!

श्री. बोरसे म्हणाले, की सटाणा शहराचा वाढता विस्तार पाहता आवश्यक त्या सुविधांची पूर्तता व्हावी म्हणून शासन स्तरावरून निधी प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. 'वैशिष्ट्यपूर्ण' योजनेअंतर्गत शासनाने १० कोटींच्या कामांना मंजुरी दिली. शहरातून जाणाऱ्या व नवावसाहतींना जोडणाऱ्या पालिका हद्दीतील चौगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Dilip Borse
Vasant More News: मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ

या रस्त्याच्या दुतर्फा सर्वाधिक नववसाहती निर्माण झाल्या आहेत. या नववसाहतींकडे जाणारा हा मुख्य रस्ता आजपर्यंत जिल्हा परिषदेकडे होता. विशेष प्रयत्न करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून त्यावर साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. याव्यतिरिक्त शेतकी संघाच्या पाठीमागील चौगाव रोड ते अजमेर सौंदाणे हा नवीन रस्ता करताना खडीकरण व डांबरीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्यासाठी नाल्यात बंदिस्त पाइपलाइन टाकून त्यावरून हा रस्ता निर्माण केला जाणार आहे. उर्वरित निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक एक, प्रभाग क्रमांक चारमधील गोपाळनगर, शनी मंदिर, शिवनेरी हौसिंग, संतोषनगर, नाशिकफाटा, विवेकानंदनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण, भाक्षी रोड साई मंदिराजवळ व सन्मित्र हौसिंग सोसायटीतील स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Dilip Borse
Shivsena News: दादा भुसेंच्या मतदारसंघात परिवर्तन होईल?

शासनाने विशेष बाब म्हणून 'नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात नागरी सेवा व सुविधांची कामे' या शीर्षकाखाली वाढीव पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील विविध प्रभागांमधील रस्ता कॉंक्रिटीकरण, समाज मंदिर अशी कामे मार्गी लावली जाणार आहे. पालिका हद्दीतील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून एकाच आर्थिक वर्षात १५ कोटी रुपये निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात कमी पडणार नसल्याचेही श्री. बोरसे यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com