मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी (Breach Candy) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ते रुग्णालयात असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देण्यात आली आहे. (Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तीन दिवस पवार यांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, तीन दिवसांच्या उपचारानंतर दोन नोव्हेंबर रोजी पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार आणि पाच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिबिरासाठी शरद पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असेही गर्जे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामतीत दिवाळी पहाट कार्यक्रमात शरद पवार हे सर्वांना भेटले होते. मात्र, त्यानंतर दुसरा दिवशी त्यांचा सोलापूर दौरा होता. तोही रद्द करण्यात आला होता. बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ते येणार हेाते. मात्र, पवारांचा दौरा रद्द झाल्याने बारबोलेंचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही लांबला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.