sharad pawar sarkarnama
मुंबई

Maharashtra News: शरद पवार 30 वर्षांनंतर ज्या बैठकीसाठी विधानभवनात आले; काय आहे वर्षानुवर्षे पेटता राहिलेला तो वादाचा मुद्दा?

Mahayuti Government: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे तब्बल 30 वर्षांहून अधिक काळानंतर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानभवनात दाखल झाले. त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत असतानाच एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन हे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अधिवेशन काळातच राजकीय हालचालींनीही वेग धरला आहे. याचदरम्यान, बुधवारी(ता.8) मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे तब्बल 30 वर्षांहून अधिक काळानंतर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानभवनात दाखल झाले. त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत असतानाच एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही उच्चाधिकार समितीची बैठक वर्षानुवर्षे पेटत्या राहिलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत होती.

माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवारांनीही आजपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य तसेच केंद्रीय पातळीवर मोठा लढा दिला आहे. दोन शेजारी राज्यांमधील हा वाद सध्याही कोर्टात प्रलंबित आहे. याच धर्तीवर झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्यातील सीमाप्रश्नावर आज उच्चाधिकार समितीची विशेष बैठक विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठक सभागृहात पार पडली. यावेळी बैठकीला उच्च अधिकार समितीचे सदस्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सचिन कल्याण शेट्टी, रोहित आर.पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आवाडे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी आणि ज्येष्ठ वकील उपस्थित असल्याचंही शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे काही दिवसांपूर्वीच राज्यात एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' यशस्वीपणे राबवले. त्यात त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदारांना फोडण्यात यश आलं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. यात शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत. अशातच शरद पवारांनी थेट विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनात उपस्थिती लावली.

विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना लढवले जात आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दालनातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील अनेक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर पुन्हा एकदा लवकरच राज्याच्या राजकारणात काही मोठे बदल होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT