suresh Mahatre, Sharad pawar  Sarkarnama
मुंबई

Bhivandi Lok Sabha 2024 News : आजारपणानंतर शरद पवार पुन्हा मैदानात; आता कल्याण, भिवंडीकडे मोर्चा

Political News : राज्यातील जवळपास ४८ मतदारसंघांपैकी तिसऱ्या टप्प्यांनंतर जवळपास २४ मतदारसंघासाठी मतदान पार पडले. आता उर्वरित २४ मतदारसंघासाठी चौथ्या व पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे.

Sachin Waghmare

Bhivandi News : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. राज्यातील जवळपास 48 मतदारसंघांपैकी तिसऱ्या टप्प्यांनंतर जवळपास २४ मतदारसंघासाठी मतदान पार पडले. आता उर्वरित 24 मतदारसंघासाठी चौथ्या व पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षाने आगामी काळात हॊत असलेल्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 तारखेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा भिवंडी लोकसभा दौरा करणार आहेत. यावेळी सुरेश म्हात्रेंच्या (Suresh Mahtre) प्रचारासाठी शरद पवार (Sharad Pawar) येणार कल्याण, भिवंडीमध्ये सभा घेणार असल्याचे समजते. (Bhivandi Lok Sabha 2024 News)

बारामतीमधील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा टप्पा शनिवारी संपल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी दोन दिवस आराम केले. त्यानंतर आता चौथ्या टप्प्यातील मतदानाला सात दिवस शिल्लक राहील आहेत. त्यामुळे प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला अवघे 13 दिवस उरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होणार आहेत. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या 12 एप्रिलला हा दौरा होणार असून शहापूरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता शरद पवार हेलिकॉप्टरने शहापूरला येणार आहेत. तिथे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता कल्याण येथे पत्रकार परिषद व त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता लक्ष घातले आहे. त्यामुळे येत्या काळात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वातावरण त्यांच्या सभेमुळे ढवळून निघणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याकडे असणार आहे.

SCROLL FOR NEXT