Baramati Political News : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून भर उन्हात आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी रात्रीचा दिवस केला. त्यांचे 22 दिवसांत तब्बल 52 सभा घेण्याचे नियोजन होते. मात्र बारामतीच्या मतदानापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काळजी व्यक्त करत शरद पवार गटातील नेत्यांचा समाचार घेतला आहे.
काटेवाडी येथे अजित पवार Ajit Pawar म्हणाले, मी शरद पवार यांच्यासोबत असतो त्यांना प्रथम तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले असते. वास्तविक त्यांच्या जे जवळचे लोक आहेत, त्यांनी आता त्यांची काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्याच्या कडक उन्हात साहेब राज्यभर फिरत होते. या उष्णतेच्या काळात त्यांच्या तब्येतेची काळजी महत्वाची होती. मात्र त्यांच्या जवळ राहिलेल्या प्रत्येकजण त्यांच्या सभेची मागणी करत होता. हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्व पवार कुटुंब शरद पवार Sharad Pawar यांच्या बाजुने उभे राहिले. यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचाही समावेश आहे. बारामती लोकसभेच्या मतदानादिवशी अजित पवारांनी आपल्या आई आशाताई पवार यांच्यासमेवत काटेवाडी येथे मतदान केले. त्यावेळी ते 'मेरे पास माँ है' असे म्हणाले.
अजित पवारांनी केलेल्या या विधानावरून श्रीनिवास पवारांनी Shriniwas Pawar टीका केली. बंधुंच्या टीकेचाही अजितदादांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, श्रीनिवास माझा लहान भाऊ आहे. माझ्या आईबाबत मी भूमिका मांडली होती. त्यात श्रीनिवास यांनी नाक खूपसण्याचे काम नाही.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी मतदान केल्यानंतर काटेवाडी येथील अजित पवार यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे घरी आल्या होत्या, पण मी नव्हतो, असे स्पष्ट केले. दरम्यान, या भेटीवर सुळेंनी मी अजित पवारांच्या नाही तर माझ्या काका-काकीच्या घरी गेले होते. ते माझेच घर आहे, असे स्पष्टीकरण दिले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.