Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Andheri By Elelction| भाजपने माघार घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar |Andheri By Elelction| अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली.

सरकारनामा ब्युरो

Andheri By Election : 'उशिरा का होईना पण भाजपने योग्य निर्णय घेतला. असे निर्णय पटकन होत नसतात, त्याला वेळ लागलो. याचा आनंद आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे. पण एका जरी अपक्षाने निवडणूक लढवायचं ठरवंल तर ही निवडणूक होणार असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली. अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने उमेदवारी अर्ज माघारी घेतला. भाजपच्या या पावलानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपच्या निर्णयाच स्वागत केलं

अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी माझी मागणी नव्हती तर माझा सल्ला होता. आता माझा सल्ला किंवा दुसऱ्या कोणाच्या सांगण्याने झालं असेल तरी माझी हरकत नाही. रमेश लटके गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. तसं तर आपण नेहमीच करतो. त्यामुळे भाजपच्या माघार घेण्याचा त्यांच्या भूमिकेवर शंका घेऊन काहीही होणार नाही. ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी, अशी आमची इच्छा होती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

काही अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली असून काही जण सायंकाळपर्यंत आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे आता जे अपक्ष उमेदवार राहिले आहेत ते आम्हाला मााहिती आहेत. त्यामुळे आता आम्ही पुन्हा आवाहन करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एमसीए निवडणुकीमुळे अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. '' मी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी उभाही नाही. एमसीए ही पक्षाची किंवा संघटनेची निवडणूक नाही. त्यामुळे या निवडणुकीत मी कधीही राजकारण करत नाही. तसेच, आशिष शेलारांना आताच नाही तर यापूर्वीही अध्यक्ष होते. त्यामुळे मीच काय बाकीचे लोकही या निवडणुकीत राजकारण आणत नाही. त्यामुळे त्याचा आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा संबंध नाही, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT