Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शिवतीर्थावरून शरद पवारांचा 'मोदी की गॅरंटी'वर जोरदार निशाणा, म्हणाले...

Rahul Gandhi Nyay Yatra News : निवडणूक आयोगाचेही मानले आभार, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

INDIA Alliance News : काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्य न्याय यात्रेचा समारोप रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीच्या भव्य सभेतून झाला. या सभेसाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने सभेला गर्दी झाली होती. याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींच्या 'मोदी की गॅरंटी' या टॅग लाईनवर टीका केली.

भाषणात शरद पवार म्हणाले, 'या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यासाठी तुम्ही सर्वजण अनेक तासांपासून थांबले आहात. यामागे एकच गोष्ट आहे. आज जी काही भारताची परिस्थिती आहे, ती बदलण्याची गरज आहे. हा बदल आपण सर्वजण मिळून घडवू शकतो. ज्या लोकांनी देशाला विविध आश्वासनं देऊन फसवलं. त्यांना दूर करण्यासाठी जेव्हा आपल्याला मत देण्याची संधी मिळेल. त्या दिवशी आपल्याला पाऊल उचलावं लागेल.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'आज ज्या लोकांच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यांनी अनेक आश्वासनं देशवासीयांना, शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, महिला, दलित, आदिवासींना दिली होती. आपण पाहीलं की त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती. त्यावर त्यांनी अजिबातही अमल केला नाही. त्यामुळे जे लोक आश्वासनं देतात आणि ती पूर्ण करत नाहीत, त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला पाऊल उचलावं लागेल आणि ही संधी आपल्याला पुढील मिळणार आहे.' असंही पवारांनी सांगितलं.

याचबरोबर 'मी एवढंच सांगू इच्छितो की हे आणखी काही आश्वासनं तुम्हाला देतील. मागील काही महिन्यांपासून दररोज टीव्हीवर खोटं बोलणं ऐकत होतो. मोदीजी की गॅरंटी ही गॅरंटी चालणारी नाही. या गॅरंटीत सिक्युरीटी नाही. त्यामुळे चुकीची गॅरंटी देऊन, चुकीचं आश्वासन देऊन, त्यांनी आपल्याला एका दुसऱ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला.' असा शरद पवारांनी आऱोप केला.

याशिवाय 'एका चांगली गोष्ट घडली की आजपासून टीव्हीवर गॅरंटी येणार नाही. हे थांबवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. मी एवढच सांगू इच्छितो की याच शहरात 1942मध्ये महात्मा गांधींनी छोडो हिंदुस्थान का नारा दिला होता. आज त्याच शहरात आपण हा निर्धार केला पाहीजे की,छोडो भाजप, भाजपपासून मुक्ती हे म्हणण्यासाठी आपण सगळे सोबत असू एवढाच विश्वास व्यक्त करतो.' असं म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT