Sharad Pawar, Eknath Shinde, Sanjay Raut, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Vs Sharad Pawar : "पवारसाहेब आमच्या हक्काचे..."; राऊतांची टीका ठाकरेसेनेच्याही जिव्हारी, नेत्यांकडून सारवासारव सुरू

Maharashtra Political Controversy : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

राजकारण आम्हालाही कळतं पण राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात, शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनातील खदखद व्यक्त करत पवारांवर निशाणा साधला.

राऊतांनी शरद पवारांवर टीका करताच शिंदेंची शिवसेना, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका करायला सुरूवात केली आहे. तर ठाकरे गटावर चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेवर आणि राऊतांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत सारवासारव केली आहे.

या सर्व प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "साहित्य संमेलन आणि वाद चिटकून येतात. शरद पवारसाहेब आमचे आहेत, आमच्या हक्काचे आहेत, ते मित्र पक्ष आहेत, मित्र पक्षावर तर आमचा अधिकार आहे. ज्यांच्यामुळे आमचा पक्ष, नाव, चिन्ह गेलं, आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यात आमचा मित्र त्या मंचावर दिसला तर आमचं व्यथित होणं स्वाभाविक आहे. शिवसेना रोखठोक बोलते. जे वाटलं ते संजय राऊत बोलले."

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले अमित शाह यांच्यामुळे, राज्यात जेव्हा शहा येतात तेव्हा शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक असते. पवारसाहेबांच्या चाली अनाकलनीय असतात, त्यांनी जावं की नाही हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. पण त्यांच्या जाण्यामुळे आम्ही व्यथित झालो. 'व्हॅलेंटाईन डे'च्या आधी रुसवे फुगवे असतात बाकी काही नाही तसच आमचं आहे, अशी सारवासारव अंधारे यांनी केली.

तर आता ज्या पद्धतीने शिंदे आणि भाजपमध्ये (BJP) कुरघोडी चालू आहेत. ते पाहता त्यांचा हनिमून पिरेड संपला असून आता ते घटस्फोटाच्या मार्गावर चालले आहेत, असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. शिवाय आमच्या हक्काच्या माणसावर आम्ही राग व्यक्त केला आहे. आमच्याकडे काय चाललं आहे. त्यापेक्षा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भाजपने काय कलगीतुरा लावला आहे ते पाहावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT