Sanjay Raut on Sharad Pawar : "आम्हालाही राजकारण कळतं पण..." शिंदेंचा सत्कार ठाकरेंच्या जिव्हारी; राऊतांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल

Eknath Shinde Award Controversy : शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं.
Eknath Shinde | Sanjay Raut | Sharad Pawar
Eknath Shinde | Sanjay Raut | Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Feb : शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं.

मात्र, हे कौतुक ठाकरेंच्या शिवसेनेला पचलेलं दिसत नाही. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यावरून थेट जेष्ठ नेते शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं. राजकारण आम्हाला देखील कळतं पण राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते देण्यात आलेल्या पुरस्कारावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवतंय, कोण कुणाला गुगली टाकतंय आणि कोण हीट विकेट होत आहे. ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं."

Eknath Shinde | Sanjay Raut | Sharad Pawar
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, "त्यांनी शेजारी बसलेल्यांवर गुगली टाकली, पण..."

ही आमची भूमिका आहे, असं म्हणत राज्यातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर ज्यांना आम्ही राज्याचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुले आम जे लोकं बसले आहेत. तर त्यांनी अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. ही आमची भावना आहे. कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण अशा प्रकारचं राजकारण जनतेला हे पटलेलं नाही.

आम्हालाही राजकारण कळतं

आपण जेष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली आणि राज्य कमजोर केलं अशांना आपण सन्मानित करता, अशामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील, असं म्हणत राऊतांनी आपली खदखद व्यक्त केली. तर यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांना सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. राऊत म्हणाले, आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात.

Eknath Shinde | Sanjay Raut | Sharad Pawar
Rushiraj Sawant : ...म्हणून घरच्यांच्या विरोधानंतरही केला बँकॉकला जाण्याचा प्लॅन, स्वत: ऋषिराजने पोलिसांना सांगितलं खरं कारण

शरद पवारांकडे चुकीची माहिती

तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल हा तुमचा व्यक्तिगत, कौटुंबिक प्रश्न असेल. मात्र, तुमचा पक्ष फोडला याचं भान राखून आम्ही पावलं टाकत असतो, असंही राऊत यावेळी म्हणाले. तर शरद पवारांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राऊत म्हणाले, "शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम शिवसेनेने केलं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com