sharad pawar soniya gandhi sarkaranama
मुंबई

Sharad Pawar : शरद पवार गटातील आमदार काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभेनंतर मोठा धमाका?

Sharad Pawar MLA on the way to Congress : शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं होतं. यातच शरद पवार गटातील आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चां रंगली आहे.

Akshay Sabale

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर ( Lok Sabha Election 2024 ) राज्यात भूकंप घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे Sunil Tatkare यांनी मोठं विधान केलं आहे. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून शरद पवार गटातील 5 ते 6 आमदार काँग्रेसच्या Congress मार्गावर असल्याची खळबळजनक दावा तटकरे यांनी केला आहे.

शरद पवार ( Sharad Pawar ) गटातील आमदारांनी दिल्लीतील काँग्रेसच्या ( Congress ) नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे. याबाबत आपल्याकडे खात्रीलायक माहिती आहे, असंही तटकरे यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितलं.

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे संकेत दिले होते. या वक्तव्याला त्यांच्या पक्षातील आमदारांच्या कृतीची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनील तटकरे काय म्हणाले?

"लोकसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही प्रमुख आमदारांचा गट काँग्रेसच्या नेत्या, सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागत आहे. हे आमदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत," असं सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी म्हटलं.

तटकरेच भाजपत जाणार...

तटकरेंच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी अजित पवार गटातील अनेक आमदार बाहेर पडणार आहेत. चार जूननंतर अजितदादांची नौका बुडालेली असेल. त्या नौकेत कुणीच बसण्यास तयार नसेल. हे माहीत असल्यानं खुद्द सुनील तटकरेच भाजपच्या नौकेत बसण्याच्या तयारीत आहेत," असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT