Pune Porsche Accident : अजितदादांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण, 'दबाव आणला नाही...'

Ajit Pawar on Sunil Tingre and Pune Porshe Accident : आमदाराच्या मतदारसंघात जेव्हा कुठली घटना घडले तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तो तेथे जात असतो. सुनील टिंगरे देखील त्यासाठीच तेथे गेले होते, असेही अजितदादांनी सांगितले.
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil Tingresarkarnama

Ajit Pawar Defends about Sunil Tingare पुणे - पुणे पोर्श कार अपघातानंतर पोलिस ठाण्यात हजर राहिलेले आमदार सुनील टिंगरे यांच्यावर ते दाबव आणत असल्याचा आरोप होत होता. या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री समोर येत नसल्याची टीका केली जात होती. अजित पवारांनी Ajit Pawar या टीकेला सडेतोड उत्तर देत 'कॅमेरासमोर येत नाही म्हणजे लपवाछपवी नाही', असे ठणकावून सांगितले. तसेच सुनील टिंगरेंवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हणत टिंगरेंची Sunil Tingare भक्कमपणे पाठराखण केली.

आमदाराच्या मतदारसंघात जेव्हा कुठली घटना घडले तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तो तेथे जात असतो. सुनील टिंगरे Sunil Tingre देखील त्यासाठीच तेथे गेले होते. या प्रकरणात त्यांनी कुठलाही दबाव आणला नाही. कुणालाही पाठीशी घाला, असे टिंगरे म्हणाले नाहीत, असे अजित पवारांनी Ajit Pawar सांगत. टीका होणाऱ्या टिंगरेंच्या बचाव केला.

Ajit Pawar- Sunil Tingre
Pune Porsche Accident : वडील, आजोबानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांकडून अटक, कारण काय?

दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तपासाची चक्र फिरली.या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबण करण्याते आले आहे. ससूनमधील दिरंगाई करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. परदेशात असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी परदेशातून परत आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुश्रीफांनी कारवाईचे आदेश दिले. या प्रकणात 'एक्साइज' डिपार्टमेंटचा सहभाग आहे. तेथे मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेत कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जात नाही. ही घटना गंभीर आहे. सरकारने ती गांभीर्याने घेतली आहे, असे अजित पवार म्हणाले.

बापाच्या बापाला अटक

या प्रकरणा अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला होता. त्याला रिमांडहोमला पाठवण्यात आले आहे. त्या मुलाच्या बापाला अटक करण्यात आली आहे. बापाच्या बापाला अटक करण्यात आली आहे.आम्हाला कुठलीही लपवाछपवी करायची नाही, हे महाराष्ट्राला, पुणेकरांना सांगायचे आहे. ही घटना घटना घडल्या पासून जसजस पुढे जातोय यामध्ये जे दोषी आढळतायेत त्यांच्यावर कारवाई होत आहे, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar- Sunil Tingre
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com