Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,विरोधी पक्षनेतेपद ओबीसीला तर प्रदेशाध्यक्षपद...?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद नको पक्ष संघटनेत जबाबदारी द्या त्या पदाला न्याय देईल असे म्हणत मोठे विधान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत भाकरी फिरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. विरोधी पक्षनेतेपद ओबीसीला तर मराठा समाजाला प्रदेशाध्यक्षपद देण्यासंदर्भातील विचार पक्षांतर्गत सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी पक्षसंघटनेत काम करण्याचा विचार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं होतं. त्यानंतर हे पद ओबीसी नेत्याला देण्यात यावं असा विचार ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता ओबीसी समाजातील नेत्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं समोर येत आहे. यामध्ये अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले मराठवाड्यातील नेते धनंजय मुंडे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे युवानेतृत्व असून विधान विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरलं होतं. राज्य सरकारबाबत सदैव आक्रमक भूमिका धनंजय मुंडे हे सभागृहात घेताना दिसत होते. त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व कौशल्य हे देखील त्यांची एक जमेची बाजू आहे. धनंजय मुंडे यांचा युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्यानं त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

छगन भुजबळांची मोठी मागणी..?

अजितदादांनी संघटनात्मक पदाची मागणी करताच छगन भुजबळांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. ''राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर एका समाजाची व्यक्ती असेल, तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. सद्यःस्थितीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे असल्याने प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी द्यावी असं विधान करत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी पक्षाचीच कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे.

याचवेळी ओबीसींबद्दल फक्त बोलून चालणार नाही. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली पाहिजे. पक्षात सुनील तटकरे, जिंतेद्र आव्हाड, धनंजय मुंडे आहेत. मला जरी ही जबाबदारी दिली तरी काम करेन. ही आमची फक्त सूचना आहे. पक्षातील कुणाला कुठले पद द्यायचे याचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील. छगन भुजबळ यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी पक्षासमोरची डोकेदुखी वाढली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते..?

मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. म्हणून मी ती जबाबदारी घेतली. नेतेमंडळींनी देखील सांगितले की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्याचमुळे या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचे म्हणणे आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झाले असेही पवार म्हणाले.

याचवेळी त्यांनी 'मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, संघटनेत कोणतेही पद द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे असंही मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT