Congress Breaking News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांची जागा घेणार राहुल गांधींचे निकटवर्तीय...

Maharashtra Congress Political News : ...यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे प्रभारीपद सोपवले जावे अशी दिल्लीतील हायकमांड यांनी ठरवले आहे.
H K Patil ; Rahul Gandhi
H K Patil ; Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बदलाचे जोरदार वारे वाहताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून मुंबई शहर अध्यक्ष बदलण्यात आले आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानं त्यांच्या जागी केरळमधील राहुल गांधी यांच्या जवळचे असणारे नेते रमेश चेन्निथला यांची नियुक्ती आठ ते दहा दिवसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

केरळमधील काँग्रेसचे नेते असलेले रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा अनुभव आहे. मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झालेला जाणून पराभवाच्या कारण शोधण्याकरिता त्यांची नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी दिल्ली हायकमांडला अहवाल सादर केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन शहराध्यक्ष भाई जगताप(Bhai Jagtap) यांचा अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते.

H K Patil ; Rahul Gandhi
Rahul Gandhi On BJP : भारतात दोन विचारधारा - एक भारत जोडा, दुसरीकडे 'देश तोडा'; राहुल गांंधीचा भाजपवर निशाणा!

राज्यात पुढील वर्षी लागोपाठ निवडणुका होणार आहे. मुंबई महानगरपालिका, लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाचे उद्धव ठाकरे यांच्याशी जागावाटपाच्या वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे प्रभारीपद सोपवले जावे अशी दिल्लीतील हायकमांड यांनी ठरवले आहे.

कोण आहेत रमेश चेन्निथला ?

रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) ला हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असल्याने राज्यातील परिस्थिती संदर्भात थेट राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची त्यांची क्षमता असल्याने त्यांना महाराष्ट्र प्रभारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

H K Patil ; Rahul Gandhi
Nitin Gadkari News : माजी नगरसेवक विसरले नितीन गडकरींचे आवाहन, निवडणुकीत फटका बसणार?

काँग्रेसमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी आतापर्यंत केंद्रातील ज्येष्ठ नेत्याकडे सोपविली जात असे. त्यात जी. के. मूपनार, माधवराव शिंदे, वायलर रवी, मार्गारेट अल्वा, मल्लिकार्जुन खरगे आदींचा समावेश होता. या तुलनेत एच. के. पाटील नवखे होते. तरीही त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कर्नाटकबाहेर त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याचा अनुभवही नव्हता. तरीही गेली दोन वर्षे त्यांनी राज्याचे प्रभारी म्हणून राज्य काँग्रेसमधील गटबाजी रोखण्यावर भर दिला होता.

चेन्निथला यांनी कोट्टायम आणि मावेलिक्कारा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा संसद सदस्य आणि हरिपड विधानसभा मतदारसंघातून सध्याच्या टर्मसह पाच वेळा आमदार म्हणून काम केले आहे. स्टेट स्टुडंट्स युनियन आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन या दोन्हींचे अध्यक्षपद भूषवणारे ते दक्षिण भारतातील एकमेव नेते आहेत.

H K Patil ; Rahul Gandhi
Ram Shinde News: व्यापाऱ्यांनी सांगितली अडचण अन् राम शिंदेंनी केला थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन...

राजीव गांधींच्या काळात भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे ते एकमेव मल्याळी आहेत. 2004 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वोच्च संस्था काँग्रेस वर्किंग कमिटीचे प्रतिनिधित्व केले आहे. केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहे. केरळमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम देखील केलेले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com