लोकसभा निवडणुकीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी बिगुल वाजलंय एवढं नक्की! अशातच उल्हासनगरमधून ओमी कलानी हे खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना जाहीर केले होते.
मात्र सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी उल्हासनगर गेले. त्यानंतर पवार - कलानी यांची भेट झाली आणि भाकरी फिरल्याची चर्चा सुरू झाली
एल्गार सभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) उल्हासनगरमध्ये गेले होते. सभेला जाण्याआधी त्यांनी पप्पू कलानी (Pappu Kalani) यांची भेट घेतली. यावेळी ओमी कलानी (Omie Kalani) यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे शरद पवार आणि कलानी यांच्यातील भेटीनंतर शरद पवारांनी भाकरी फिरवली की काय, अशी चर्चा रंगतेय.
सुरुवातीला पप्पू कलानी नेमके कोणत्या पक्षात आहेत या संदर्भात संभ्रम होता. त्यानंतर ओमी कलानी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना टीम ओमी कलानी हा आपला वेगळा पक्ष आहे असे सांगितले. मात्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) हे आपले मित्र असून लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.
पप्पू कलानी यांचे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहेत. ते या पक्षातून आमदार देखील झाले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. म्हणूनच उल्हासनगरमधील सभेपूर्वी त्यांनी पप्पू कलानी यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
यासंदर्भात ओमी कलानी यांना विचारले असता, सध्या पप्पू कलानी कोणतेही राजकीय निर्णय घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उल्हासनगर शरद पवारांनी पप्पू कलानी यांची सदिच्छा भेट घेतली असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पप्पू कलानी यांच्यावर खुनाच्या प्रकरणी टाडा लावण्यात आला होता. 2013 मध्ये इंदर भतिजा खून खटल्यात त्यांच्यावर कोर्टात गुन्हा सिद्ध झाला होता. या गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
त्यानंतर कलानींना पॅरोलवर सोडण्यात आले. तेव्हा पप्पू कलानी हे कायमचे बाहेर असल्याचे सांगत ओमी कलानी यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. अजूनही पप्पू कलानी बाहेर असून राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते.
पप्पू कलानी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाले. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि अजित पवार वेगळे होऊन सत्तेत सामील होत राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ओमी आणि पप्पू कलानी नेमके कोणाच्या गटात आहेत हे समजणे अवघड झाले.
त्यातच रोहित पवार यांनी उल्हासनगरमध्ये जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली. काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी अजित पवार आणि पप्पू कलानी यांची भेट होईल, अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही.
त्याच दिवशी रात्री एका कार्यक्रमाला जाताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांची गाडीत भेट घेतली आणि आपण लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. मात्र आता शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतल्याने शरद पवारांनी भाकरी फिरवली की काय, अशी चर्चा राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.