Medha Kulkarni : मै शेरनी हूं जिगरवाली..!

Rajya Sabha Election 2024: पुणे महापालिकेच्या राजकारणातून कोथरुडचे नेतृत्व करीत, थेट राज्याच्या राजकारणात उतरलेल्या माजी आमदार आता दिल्लीच्या राजकारणात जाणार आहेत.
Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Chandrakant Patil
Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Chandrakant PatilSarkarnama

Mumbai News: पुणे महापालिकेच्या राजकारणातून कोथरुडचे नेतृत्व करीत, थेट राज्याच्या राजकारणात उतरलेल्या माजी आमदार आता दिल्लीच्या राजकारणात जाणार आहेत. त्याकरिता मेधाताईंना भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. अर्थात, भाजपच्या बेरजेच्या राजकारणातून मेधाताई शेवटी दिल्लीतून राजकारण करणार, हे निश्चित झाले आहे. (Rajya Sabha Election 2024)

भाजपच्या झंझावातात पुण्यातील तेही कोथरुडमधून थेट विधानसभेत जाणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि 2019 सालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या डावपेची राजकारणामुळे मेधताईंना दुसऱ्यांदा आमदारकीपासून लांब राहावे लागले. त्यात, माजी महापौर मुरलीधर मोहोळांच्या वाढलेल्या आकांक्षेमुळेही मेधाताईंचे राजकारण थांबले, ते संपल्याचे बोलले जात असतानाच राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव झळकले. मेधाताईंनी अखेर चंद्रकांतदादा आणि मुरलीआण्णांच्या नाकावर टिच्चून राजकारण टिकवले, ते वाढवले, एवढेच नव्हे तर दिल्लीही गाठली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Chandrakant Patil
Medha Kulkarni News : अखेर मेधा कुलकर्णींनी करुन दाखवलंच; माजी आमदार ते थेट खासदार!

मेधाताईंच्या या राजकीय कुरघोडीने पुण्यातील विशेषतः कोथरुडमधील काही भाजप नेत्यांना 'शॉक' बसला असावाच. पण, मेधाताईंना डावलून राजकीय कमान चढण्याच्या प्रयत्नातील मंडळींना जुन्या-नव्यांना 'जुना' हिशेबही चुकता करावा लागणार, याचा अंदाज मेधाताईंच्या विरोधकांना आला असावाच. असो...या मंडळींचे राजकारण सुरू राहणार यात शंका नाही.

भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नसतानाही मेधाताई या पुणे महापालिकेच्या सभागृहात 3 टर्म नगरसेविका राहिल्या. महापालिकेच्या 2002, 2007 आणि त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. या काळात त्यांची पक्षात मोठी छाप होती. याच दरम्यान, भाजपला सुगीचे दिवस येताच आणि शिवसेनेसोबत (ठाकरेंची शिवसेना) दोन हात करण्याची वेळ ओढावल्यावर भाजप नेतृत्वाने मेधाताईंना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदेंचे आव्हान मोडीत काढत मेधाताई विधानसभेत गेल्या. याच काळात राज्यात फडणवीसांचे म्हणजे, भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि मेधाताई मंत्री होणार असल्याच्या चर्चा झडत राहिल्या. पण तसे काही झाले नाही.

Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Chandrakant Patil
Rajysabha election 2024: राज्यसभेसाठी भाजपची अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना उमेदवारी

आमदार म्हणून मेधाताईंनी कोथरुड हलवून ठेवल्याच्या घटना आहेत. त्या सरकारमध्ये मंत्री काय, पण पुढे विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत तेव्हाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष, चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून लढण्यास पसंती दर्शवली आणि मेधाताईंच्या राजकारणाला खीळ बसली. यानिमित्ताने मेधाताईंचा पत्ता कट झाल्याचा काही मंडळींना प्रचंड आनंद झाला. पुढे त्यांना विधान परिषदेत घेण्याच्या चर्चा झाल्या. पण त्यात काहीच तथ्य नव्हते. हेही मेधाताईंनाही चांगले ठाऊक होते.

विधान परिषद काय, साधे पक्षाच्या कार्यक्रमांत त्यांना डावल्याचे राजकारण घडले. त्यामुळे त्यांचे राजकारण संपले, असा अंदाज बांधला जात होता. या घडामोडींना पुण्याच्या राजकारणात काहीशा शांत राहिलेल्या पण पक्ष संघटनेत मोठ्या पदावर काम करण्याची त्यांची खेळी होती. त्यानुसारच मेधाताई राज्य संघटनेऐवजी, राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत गेल्या. त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीची जबाबदारी आहे.

त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या संपर्कात राहिल्या. या गाठीभेटीत त्यांना आपल्यावरील अन्यायाकडे वरिष्ठांचे लक्ष वेधले. पण गाऱ्हाणी सूर न ठेवता, आपले राजकारण कसे उजवे आहे, हेही त्या पटवून देत होत्या. त्याचेच बक्षिस म्हणून मेधाताईंना राज्यसभेत घेण्याचा निर्णय भाजपच्या दिल्लीश्वरांनी घेतला आहे.

यानिमित्ताने, मेधाताई आता मुंबई नाही तर दिल्लीच्या राजकारणात तेही कोथरुडपुरते नव्हे, सबंध राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी फैसला, येत्या 27 फेब्रुवारीच्या निवडणुकीनंतर होईल. मात्र, भाजपकडचे संख्याबळ पाहता, त्या राज्यसभेत जातीलच. संख्याबळाचा नाही तर फोडाफोडीत माहीर आणि आजघडीला अव्वल ठरत असलेल्या भाजपला मेधाताईंना दिल्लीत पाठवणे काहीच अवघड नाही. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागेलच, पण मेधाताईंची उमेदवारी ही चंद्रकांतदादा, मुरलीआण्णांच्या नाकावर टिच्चून, 'मी खासदार झाले ना ?' अशीच आहे. हे दादा, आण्णांना कळले असावे.

दिल्लीला पाठवून विधानसभेचं दोर कापलं

मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने ट्रिपल मोहीम फत्ते केली आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवून 2019 मधील आमदारकीचे तिकीट कापल्याची भरपाई केली. त्यामुळे मेधा कुलकर्णी आणि कोथरूडमधील मतदारही सुखावले असतील. त्यामुळे यंदा विधानसभेसाठी कोथरूडमध्ये पुन्हा चंद्रकांत पाटील निवडणूक लढवण्यास निर्धास्त झाले असून त्यांच्यासाठी मतांची बेगमीही चांगली होईल. म्हणजे सलग दुसऱ्यांदा त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाला मुकणार आहेत. शिवाय राज्यसभेवर जाणार असल्याने त्या सहा वर्षे दिल्लीत असतील. म्हणजेच 2029 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पत्ता कापला जाईल. थोडक्यात सलग तीन टर्म त्या कोथरूड मतदारसंघाला दुरावतील.

Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Chandrakant Patil
Medha Kulkarni News : मेधा कुलकर्णींची राज्यसभेवर वर्णी लागणार?, पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com