Sharad Pawar On Nana patole :
Sharad Pawar On Nana patole : Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Nana patole : नाना पटोलेंचा दावा पवारांनी फेटाळला; म्हणाले, मुख्यमंत्री तर...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar On Nana patole : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसून येत नाही. आघाडीतीलच मुख्य नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते व प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात टीका-टिपण्णी होत होती. आता आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाबाबतही सुसूत्रता दिसत नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे.

नुकतेच नाना पटोले (Nana Patole) यांनी, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ज्याचे आमदार सर्वाधिक असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे म्हणाले आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत, पटोलेंच्या वक्तव्याला नाकारले आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार काय म्हणाले ?

आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, नाना पटोले यांचं मत वैयक्तिक स्वरूपाची आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीत कसलीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीसंदर्भात जी काही चर्चा केली जात आहे, ती आता संपली आहे. लवकरच या बाबतीत आम्ही सारे महाविकास आघाडीचे सर्व सहकारी एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता :

"कर्नाटकातील स्थानिक नागरिक जनता भाजपवर नाराज आहे. देशभरात भाजपची घसरण सुरु आहे. आगामी निवडणुकांमध्ये केवळ ५ ते ७ राज्यातच भाजपची सत्ता येईल. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल," असा दावा पवारांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT