Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : "निवडणुका असल्यामुळे..."; केंद्र सरकराने दिलेल्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी उपस्थित केली शंका

Jagdish Patil

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकाकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. आगामी विधानसभा आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांना ही सुरक्षा दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, केंद्राने दिलेल्या या सुरक्षेवर स्वत: शरद पवारांनीच शंका उपस्थित केली आहे. केंद्राने दिलेल्या झेड प्लस सुरक्षे संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, "गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला असल्याचं मला सांगितलं.

यावेळी मी त्यांना 'इतर दोन कोण आहेत?' असं विचारलं असता त्यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची नावं सांगितली. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहिती नाही. कदाचित निवडणुका असल्यामुळे सगळीकडे फिरावं लागतं त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केली असावी. नक्की काय सांगू शकत नाही.

पण गृहविभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काय निर्णय घेणार आहे." असं म्हणत पवारांनी केंद्राने आपल्यावर देखरेख करण्यासठी सुरक्षा पुरवल्याची शंका व्यक्त केली आहे. सध्या पवारांना राज्याची झेड प्लस सुरक्षा आहे. तरीही त्यांना आता केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

शरद पवार कोण मारणार?

तर शरद पवारांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरुन भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?" अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT