Mumbai News, 23 August : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतलं आहे. तुपकर हे आज शुक्रवारी (ता.23 ऑगस्ट) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करणार होते.
मात्र, वर्षा निवास्थानी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी आंदोलनाचा करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज ते वर्षा निवासस्थानी धडक देणार होते.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त देखील तैणात करण्यात आला होता. अशातच आता तुपकर (Ravikant Tupkar) आंदोलन करण्यासाठी जाण्याआधीच त्यांना मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी सोयाबीनला 9 आणि कापसाला 12 हजार रुपये दर द्यावा. तसंच शेतकरी कर्जमाफी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यासह विविद मागण्या त्यांनी सरकारडे केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.