Sanjay Raut And Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Sanjay Raut: शिंदेंच्या सत्कारावरुन आदळआपट करणाऱ्या राऊतांचा पवारांनी एकाच वाक्यात निकाल लावला

Sharad Pawar On Neelam Gorhe : हे अधिवेशन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नीलम गोऱ्हे यांनी नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या, असं मतही शरद पवार यांनी स्पष्ट केली.

Deepak Kulkarni

Mumbai News : काही दिवसांपूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.या सत्कारानंतर महाराष्ट्राचं राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी ढवळून निघालं होतं.तसंच शरद पवारांनी केलेला शिंदेंचा सत्कार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याचमुळे शरद पवारांनी (Sharad Pawar) तरी या सत्काराला जाणं टाळायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देतानाच पवारांना लक्ष केलं होतं. त्याच राऊतांना शरद पवारांनी एकच वाक्यांत फटकारलं.

ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवारांनी सोमवारी (ता.24) पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,महादजी शिंदे पुरस्कार,महाराष्ट्रातील राजकारण अशा विविध मुद्द्यांवर थेट भाष्य करतानाच संजय राऊतांच्या (Sanjay Raut) टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले,मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी लक्षात ठेवेन असा खोचक टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

पवार म्हणाले, संजय राऊत यांनी विषय काढला. त्यात काही चुकीचं नाही. एका संस्थेने शिंदेंचा सत्कार ठेवला. मी तिथे होतो. त्यात मी सहभागी झालो. फारसं चुकीचं नाही. शिंदेंसह 15 लोकांना पुरस्कार दिला. 14 लोकांचं नाव कोणी छापलं नाही. पण हा पुरस्कार राजकीय संघटनेने दिला नाही. पुरस्कार दिल्लीतील मराठी लोकांनी दिल्याचंही पवारांनी आवर्जून सांगितलं.

तसेच ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावताना शरद पवार म्हणाले, माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे अशा तीनही पक्षांच्या सर्व खासदारांची बैठक झाली.आम्ही दोन तीन तास चर्चाही केल्याचीही माहिती पवारांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी या बैठकीत कुणाच्याही मनात फुटण्याचा विचार नव्हता.उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एका विचारानं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.

दरम्यान,दिल्लीमध्ये आयोजित साहित्य संमेलनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती आणि एकनाथ शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर गंभीर आरोप केला. त्यांनी एका पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज द्यावा लागतात असं दावा केल्यानं राजकारण तापवलं गेलं, त्यावर पवार यांनी संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100 टक्के बरोबर आहे असं म्हणत त्यांचं समर्थनही केलं. तसेच हे अधिवेशन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता.त्यात नीलम गोऱ्हे यांनी नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या, असं मतही शरद पवार यांनी स्पष्ट केली.

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवार म्हणाले, 'नीलम गोऱ्हे यांनी मर्यादित काळात विविध पक्षांचा अनुभव घेतला आहे. गोऱ्हेंनी ते वक्तव्य केलं नसतं तर योग्य झालं असतं. अगदीच स्पष्टपणे सांगायचे झाले तर त्यांचे ते विधान म्हणजे मूर्खपणा होता. नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती, हे माझं मत होते, असंही पवार यांंनी फटकारलं.

हे संमेलन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या. त्यांनी कोणत्या गाडीचा उल्लेख केला. मला वाटतं की, राज्याच्या विधीमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाले असतील. या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा सहभाग, त्याची चर्चा न केलेली बरी, असेही शरद पवार यांनी सांगत गोऱ्हेंवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT