Fadnavis reaction on Raj and Uddhav Thackeray Meet : ''राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले असतील, अन् त्यांच्यात...''; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान!

BJP reaction on Thackeray brothers : 'सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यालासुद्धा सुसंवाद कसा करावा हे..' असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Raj Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Fadnavis statement on Thackeray alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. मागील तीन ते चार वर्षांमधील राजकीय उलथापालथ बघितली तर आता सर्वसामान्य जनताही आवाक झाली आहे. कधी कोणता पक्ष कोणाशी युती करेल, याचा काही भरवसा नाही. शिवसेना आणि काँग्रेस सारखे पारंपारिक विरोधी पक्ष एका आघाडीत आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती आहे. त्यात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा रोज कानावर पडत असतात. विशेष म्हणजे काही घटनांमुळे या चर्चांना अधिकच वाव मिळत असतो.

आता नुकतंच मुंबईत राज ठाकरे(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे एका विवाहसमारंभात एकत्र दिसून आले होते. एवढच नाहीतर या दोघांमध्ये हास्यविनोद होत बोलणं झाले. त्यामुळे हे दोघेही एकत्र यावेत अशी इच्छा बाळगणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सुखद धक्काही बसला. तर यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. आता तर यावर थेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Raj Thackeray
Devendra Fadnavis : माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावले; म्हणाले, 'तो माझा...'

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? -

‘’एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असतील आणि त्यांच्यात सुसंवाद होत असले तर त्यांचे स्वागतच आहे. दोन भावांडाच्या संवादावर मी बोलणे योग्य नाही. केवळ संवादापेक्षा सर्वांनी सुसंवाद करावा. सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यालासुद्धा सुसंवाद कसा करावा हेसुद्धा त्यांनी शिकवले पाहिजे.'' असा टोलाही त्यांनी संजय राऊत(Sanjay Raut) यांना लागावला.’’

तर या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया समोर आली होती.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Raj Thackeray
Neelam Gorhe : "मर्यादा पाळाव्यात..."; CM फडणवीसांनी नाव न घेता टोचले गोऱ्हेंचे कान

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, "काही विषय समजण्यापलीकडे असतात. गेल्या दोन वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. आम्ही भूमिका बदलेली नाही. हुडी-बिडी घालून, रात्री-अपरात्री आम्ही कोणाला भेटायला गेलेलो नाही. आम्ही सर्वांसमोर मुख्यमंत्र्यांना भेटतो. सर्व मागण्या माध्यमांसमोर मांडतो". पण काही पक्ष 'बिनशर्ट' पाठिंबा देतात. कधी स्वबळावर लढतात. कधी मतदानातील घोळावर बोलतात. तर कधी बैठका घेतात. कितीही पडझड होऊ द्या किंवा करू द्यात, आम्ही आमचा विचार सोडणार नाही. भूमिकेत सातत्य हवे. पण तेच होत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com