Jaykumar Gore Accident, Sharad Pawar
Jaykumar Gore Accident, Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : आमदार गोरे यांच्या अपघातानंतर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ''राजकीय जीवनात हा मोह...''

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar On Jaykumar Gore Accident : भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत,शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जात गोरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील गोरे यांच्या अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, रात्री अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही. याबद्दल घरातील लोकं मला नेहमी बोलतात. परंतू, राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. तसेच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.

पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पुण्याहून दहिवडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. यावेळी फॉर्च्युनर कंपनीच्या गाडीमध्ये गोरे हे पुढे बसलेले होते. त्यांच्यासोबत गाडीचा चालक, स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक होते. पण अपघातावेळी गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रामध्ये गाडी कोसळली. आमदारांसह सगळेच जखमी झाले होते. पण स्थानिकांनी मदत केली आणि चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आमदार गोरेंना पुण्याला हलवलं अन् इतरांवरही उपचार सुरु झाले.

मात्र, या अपघातानंतर जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी हा अपघात आहे की घातपात असा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी ना रस्त्यावर कोणतीही रहदारी, ना धोकादायक वळण, ना गाडीमध्ये तांत्रिक बिघाड तरीही आमदार जयकुमार गोरेंचा अपघात झाला कसा? असा प्रश्नही गोरे यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT