Sharad Pawar News : Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांनी बीडमध्ये ताकद दाखवली अन् अजितदादांनी देवगिरीवर बैठक बोलवली !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीरांना धडा शिकविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर दौरा करणार आहेत. त्यातच बीडमध्ये जंगी सभा घेत पवार नव्याने पक्ष उभारण्याच्या तयारीत आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यामुळे त्यांच्याच पक्षातील विरोधी गटाला म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक मंत्री, आमदारांच्या पोटात गोळा आला असावा. तेव्हाच, पवारसाहेबांच्या बीडमधील सभेला उत्तर देण्याची तयारी अजितदादांच्या गोटात सुरू असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

याच अनुषंगाने अजितदादांच्या गटातील मंत्री अन् आमदारांची गुरुवारी देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत पवारसाहेबांना उत्तर देण्याच्या हेतूने सभा घेण्याची भूमिका घेतली जाणार असल्याचे दिसत आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar News)

शरद पवारांचा बीड दौरा -

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी दुपारी सभा पार पडली. बीडमध्ये पोचल्यानंतर ते जोरदार शक्तिप्रदर्शन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. बीड नाक्यावरून मोठी रॅली काढण्यात आली. रॅलीत वाहनांचा मोठा ताफा असणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून बीड शहरात मोठे शक्तिप्रदर्शन शरद पवार गटाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT