Dharmarao Baba Atram News : पवारांनी ठणकावल्यानंतरही धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, "शरद पवार हे आमचे गुरू, त्यांचे फोटो लावणारच..

Maharashtra Politics : . न्यायालय काय कायदेशीर कारवाई करेल तेव्हा बघू , पण ते आमचे गुरू आहेत.
Sharad Pawar Rally In Beed
Sharad Pawar Rally In Beed Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "माझा फोटो वापरल्यास कोर्टात जाईल," असा इशारा दिला आहे. पण त्यांच्या इशाऱ्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्याने दुर्लक्ष केले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी (ता. 16) शरद पवार यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी "माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन,' असा इशारा अजित पवार गटाला इशारा दिला आहे.

धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, “शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरूंचे फोटो लावणारच. न्यायालय काय कायदेशीर कारवाई करेल तेव्हा बघू , पण ते आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो लावणारच. शरद पवारांचे आशीर्वाद राहिले पाहिजेत. ते एनडीएत येणार की नाही सांगू शकत नाही. त्याबाबत निर्णय नेते घेतील,"

Sharad Pawar Rally In Beed
Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

छगन भुजबळ यांनीसुद्धा शरद पवार यांच्या इशाऱ्यावर भाष्य केलं आहे. "माझ्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये शरद पवार यांचा सर्वात मोठा लावणार आहे. आता ते काय करणार. कुठे कुठे जाऊन ते फोटो काढणार? ते आमचे नेते आहेत, गुरु आहेत, त्यांच्याविषयी आस्था असल्याने आम्ही प्रेमाने त्यांचा फोटो लावतो. त्यामुळे प्रेमाने, आस्थेने त्यांचा फोटो लावणे गुन्हा आहे का? असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar Rally In Beed
Shivraj Bangar Resigns: शिवराज बांगरांची सहा महिन्यातच बीआरएसला सोडचिठ्ठी; BRS ही भाजपची बी टीम..

आज (गुरुवार) बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित दादा पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील सभेनंतर आता दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर होत आहे. ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे सभेत शरद पवार काय बोलणार आणि अजित पवार त्याला उत्तर काय देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उत्तर सभेचे आयोजन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com