Sharad Pawar :
Sharad Pawar : Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : 'राष्ट्रपती राजवटीबाबत 'ते' विधान चेष्टेत केलं : शरद पवारांचे भाष्य !

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर टीका-टिपण्णी थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी घडून आल्याचा, फडणवीस यांनी दावा केला होता. यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असे, शरद पवार म्हणाले होते. मात्र आता हे वक्तव्य आपण तर मस्करीच्या सूरात केले होते, असे पवारांनी म्हंटले आहे.

शरद पवार यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे आता पुन्हा या पहाटेच्या शपथविधीभोवती चर्चा होताना दिसत आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटची कोंडी फुटली, हे वक्तव्य आपण मस्करीमध्ये, गमतीमध्ये केलं होतं, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे. यासोबतच,'केंद्र सरकार जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट उठवत असेल तर, चांगलंच आहे, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

पवार म्हणाले, "पहाटेच्या शपथविधीवर मी मस्करीत भाष्य केलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण मी हेच म्हणालो होतो की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. माझ्या सांगण्यावरून जर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट हटवली जात असेल, तर चांगलंच आहे."

दरम्यान, यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य केलं होतं. राष्ट्रपती राजवट कोणत्या परिस्थितीत लागू झाली. कोणामुळे लागू झाली, याचा ही खुलासा झाला पाहिजे, असे फडणवीस सूचकपणे म्हणाले होते. यानंतर पवारांच्या या विधानावर चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT